कोणत्या अवयवांचे दान करू शकतो आपण , जिवंतपणी व मृत्यूनंतर ? डॉ. अपर्णा पाटील.
ऐ जिंदगी, तेरे जज्बे को सलाम !
पता हैं, कि मंजिल मौत है.......
फिर भी, मौत के बाद ...
किसी और के लिए दौड सकती है ...|
मनात प्रश्न येतो की कोणत्या अवयवांचे दान करू शकतो आपण ?
याचे उत्तर आहे की...., आपण अवयवदान एकतर जिवंतपणी करू शकतो किंवा मृत्यूनंतर !
जिवंतपणी...
जिवंत व्यक्ती काही मर्यादित अवयवांचे दान करू शकते जसे .......
• रक्तदान ( Blood donation)
• अस्थिमज्जा ( bone marrow)
• एक मूत्रपिंड ( A Kidney)
• यकृताचा काही भाग (Part of Liver)
• फुफ्फुसाचा काही भाग(Part of lung)
• स्वादुपिंडाचा काही भाग( Part of
Pancreas)
ही व्यक्ती, आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी (Related ) म्हणजे....... मुलगा , मुलगी , आई , वडील ,भाऊ ,बहिण ,पती ,पत्नी यांच्यासाठी अवयवदान करू शकते. या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला ( Non related ) अवयव द्यायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते.
शासन, रुग्ण व दाता यामध्ये कोणतीही आर्थिक देवाणघेवाण नसून, फक्त प्रेम व स्नेह या नात्याने अवयवदान होत आहे...... याची खात्री झाल्यावरच परवानगी देते.
जिवंत व्यक्तीच्या जीवनपद्धतीत व प्रकृतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
मृत्यूनंतरचे अवयवदान
हे अवयवदान मृत्यू कोणत्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून असते म्हणजे........
१) हृदयक्रिया बंद होऊन झालेला मृत्यू ( Cardiac Death)......
मग तो घरी असो किंवा हॉस्पिटल मध्ये असो ही व्यक्ती फक्त नेत्र व त्वचा या अवयवांचे दान करू शकते. तेही मृत्यूनंतर सहा तासापर्यंत आपण हे दान करू शकतो. यावेळी मृत्यू दाखला ( Death certificate) असणे हे गरजेचे असते.
हृदयक्रिया बंद पडल्यामुळे,
⬇️
महत्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा थांबतो,
⬇️
अवयवांना प्राणवायू न मिळाल्यामुळे त्यांचे कार्य बंद पडते.
⬇️
हे अवयव अवयवदान साठी बाद ठरतात.......
लक्षात घ्या, घरी मृत्यू झाला असेल तरी नेत्रपेढी व त्वचापेढी
यांची टीम घरी येऊन नेत्र व त्वचा गोळा करू शकतात.
२) मस्तिष्कस्तंभ मृत्यू ( Brain stem death or Brain death).......
हा मृत्यू रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच घोषित केला जातो.
ही मृत व्यक्ती अनेक महत्त्वाच्या अवयवांचे दान करू शकते जसे.......
दोन नेत्र.
दोन मूत्रपिंडे.
यकृत.
दोन फुफ्फुसे.
ह्रदय.
स्वादु पिंड.
लहान आतडे.
त्वचा.
हाडे.
कानातील हाडे.
दोन्ही हात.
स्वरयंत्र.
रक्त वाहिन्या असे......
जरा कल्पना करा....
या अवयवदानाने आपण जवळजवळ ५० लोकांच्या जीवनात आनंद फुलवू शकतो...
आपले ह्यदय कोणा दुसऱ्यासाठी धडधडतय !
आपली फुफ्फुसे कुणासाठी तरी श्वास घेताहेत !
आपल्या मूत्रपिंडांमुळे कुणा दोन व्यक्तींची डायलिसिस पासून सुटका झाली आहे !
आपल्या नेत्रा मुळे कुणाला रंगाची ओळख होतेय !
आपल्या हाडांमुळे कुणाचे सांधे दुरुस्त झालेत !
आपल्या त्वचेमुळे कुणा भाजलेल्या रुग्णाच्या वेदना कमी होत आहेत !
दोस्तों ,
कुछ रिश्ते मुनाफा नहीं देते......
मगर , गुजरी जिंदगी जरूर अमीर बना देते है |
© Dr. Aparna V. Patil
MD( obstetrics and gynaecology)
Organ Donation awareness.
( वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments
Post a Comment