अवयवदान - नेत्रदान !! डॉ. अपर्णा पाटील .
नेत्रदान
नेत्र - आपल्या शरीरातील एक महत्वाचा sensory organ !!
आपण जर डोळ्याची रचना बघितली तर ती खालील प्रमाणे ...
छायाचित्र सौजन्य .... Google
नेत्रदानात फक्त पारदर्शक पटल किंवा cornea याचाच उपयोग केला जातो . Cornea ला कोणत्याही कारणामूळे इजा झाली, तर ते पटल धूसर बनते . सर्वसामान्य या स्थितीला "डोळ्यात फुल पडणे " असे म्हणतात . जसे -
फटाक्या मूळे इजा
विटामीन अ (A) ची कमतरता
chemical ने झालेली इजा
foreign body ने झालेली इजा
आपल्या भारतात जवळजवळ १.५ करोड लोक दृष्टीहीन आहेत . त्यातील साधारण ५० लाख लोक डोळ्याच्या cornea ला इजा झाल्यामूळे दृष्टीहीन आहेत . अशा रुग्णांना नेत्रदानामूळे पून्हा दृष्टी लाभू शकते .
सांगली येथील नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी एक छान उदाहरण देऊन हे स्पष्ट केले आहे - जसे - इंजीन खराब झालेल्या कारची चांगली काच .....चांगल्या स्थितीत असलेल्या, धूसर काचेच्या दुसऱ्या गाडीला बसवणे .
मित्रहो, लक्षात घ्या - १ वर्षे वयापासून ८० वर्षे किंवा त्याच्याही पूढे (जर दृष्टी उत्तम असेल तर ) व्यक्ति नेत्रदान करू शकते . त्याला वयाची अट नाही . ज्यांना चष्मा आहे किंवा ज्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे , अशा व्यक्तिही नेत्रदान करू शकतात.
Friends, give the gift of vision ....A new experiene to the blind ! !
जरा विचार करा की -
सकाळचा सूर्योदय, संध्याकाळ चा सूर्यास्त, आकाशात चमचमणारे तारे, सर्व निसर्ग सौंदर्य ह्याचा आस्वाद घेतोय आपण - आणि अचानक तुमची दृष्टी जाते व चहूकडे अंधारच अंधार ! कसे वाटेल आपल्याला ?
मित्रहो ....
Eyes are a precious gift to mankind. A wise man utilizes the gift while alive and even after death .
Leave back your vision !
© Dr. Aparna Viraj Patil
MD(Obstetrics and Gynaecology)
Organ donation awareness
(वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments
Post a Comment