अवयव म्हणजे काय? अवयवदानाचा इतिहास.
संत तुकाराम महाराजांनी योग्यच म्हटले आहे ,
" वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे |"
परोपकारी वृत्ती शिकावी, ती झाडांकडून !
![]() |
Trees are givers of life. They provide many selfless services to us. Let's be like a tree, the giver !!! |
अवयव म्हणजे काय?
Friends.... आपले शरीर हे एखाद्या मशीन प्रमाणे आहे. या मशीन चे अनेक भाग एकत्रित पणे काम करतात व त्यामुळे हे मशीन व्यवस्थित कार्यरत राहते. आपले शरीर हे अशा अनेक भागांचा संगम आहे. हे भाग म्हणजेच आपले अवयव! आपल्या देहरुपी मंदिरात, अनेक मौल्यवान अवयव, जसे...... यकृत (Liver), ह्रदय ( Heart), मुत्रपिंडे ( kidneys), फुफ्फुसे ( Lungs) व इतर, कार्य करीत असतात. या अवयवांचे दान म्हणजेच अवयवदान !
अवयवदानाचा इतिहास......
चायना, रोम, इटली यांच्या इतिहासात अवयवदानाचा उल्लेख दिसतो. भारतात प्रसिद्ध शल्यविशारद "सुश्रुत" याने प्रथम त्वचेचा ग्राफ्ट बसवून नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख सापडतो. शस्त्रक्रियांचे यश वा अपयश याचा विशेष उल्लेख नाही.
जवळ जवळ १९०० सालापर्यंत आपण असे प्रत्यारोपण करू शकतो ही कल्पना त्यावेळी चिकित्सकांना आली होती. याचे श्रेय फ्रेंच सर्जन "अलेक्सिस कैरल" ( Alexis Carrel) यांना जाते. त्यांना यासाठी १९१२ मध्ये "नोबेल प्राईज" पण मिळाले. पहिले ह्रदयप्रत्यारोपण दक्षिण आफ्रिकेत १९६७ मध्ये झाले. रुग्ण केवळ १८ दिवस जिवंत राहिला. पहिले यशस्वी ह्रदयारोपण १९८१ साली झाले. मुंबईत २७ मार्च १९९७ साली पहिले मुत्रपिंड प्रत्यारोपण, सायन रुग्णालय येथे झाले म्हणून २७ मार्च हा "अवयव दिन " म्हणून साजरा करतात.
असा आहे अवयवदानाचा इतिहास !
Friends...
© Dr. Aparna V. Patil
MD (obstetrics and gynaecology)
Organ Donation awareness.
Mumbai.
( वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)


Great information
ReplyDelete