अवयवदान ! जनजागृती ! Organ donation.....Gift of life ! Be an organ donor!!!
अवयवदान....महादान !
आ जिंदगी,
तुझ में भी कुछ रंग भर दू.....
अवयवदान करके...
किसी के ख्वाब पुरे कर सकू......|
अवयवदान ,अवयवांचे दान ...... हे आधुनिक जगात श्रेष्ठदान समजले जाते .आपले शरीर हे विविध अवयवांचा संगम आहे. अवयव ही मानवी शरीरास एक देणगी आहे. आपले जीवन संपल्यानंतरही आपण अवयवदानाने , ज्या रूग्णांचे अवयव अंतिम स्वरूपात निकामी झाले आहेत ,अशा रुग्णांचे प्राण वाचू शकतो ,जीवनदान देऊ शकतो .... अशा रुग्णांसाठी ही नवसंजीवनी आहे.
आता आपल्या मनात हा विचार येणे साहजिकच आहे की हे दान केलेले अवयव इतर रुग्णांना कसे काय मदत करतात?
अवयवदान, Organ donation ह्या बरोबर तुम्ही अवयव प्रत्यारोपण, organ transplantation ह्याबद्दल ऐकले असेलच, जी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची फार मोठी यशस्वी कामगिरी आहे. अवयवदान व अवयव प्रत्यारोपण या " पूर्ण " प्रक्रियेमध्ये जिवंत अथवा मृत व्यक्तीचा निरोगी अवयव वा अवयवांचा काही भाग शस्त्रक्रियेच्या सहाय्याने विलग करून गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केला जातो.
ठोस उदाहरण द्यायचे झाले तर.... समजा एखाद्या रुग्णाला kidney failure हा विकार आहे. तर त्याची उपचार पद्धती आहे, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण म्हणजे Kidney transplantation परंतु दाता मिळेपर्यंत त्याला दुसऱ्या तात्पुरत्या उपचार पद्धतीवर, डायलिसिस ( Dialysis) वर ठेवले जाते. मुत्रपिंड ही ही शरीराची "गाळणी" आहे. रक्त गाळून त्यातील घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे कार्य ती करते.रुग्ण डायलिसिस या उपचार पद्धतीवर पाच ते सात वर्ष जगू शकतो अन्यथा रुग्ण दगावतो.वेळेवर दाता उपलब्ध झाल्यास या रुग्णांचे जीवन वाचू शकते. त्या रुग्णासाठी हा पुनर्जन्म ठरू शकतो.
आपल्या भारतात , पूर्ण जगभर असे अनेक रुग्ण दिसून येतात. निरोगी अवयव वेळेवर न मिळाल्यामुळे, दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. आज अवयवदान ही काळाची गरज आहे परंतु मागणी जास्त व पुरवठा कमी ही परिस्थिती आहे.आणि म्हणूनच अवयव दानाविषयी जनजागृती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
आपल्या सर्वांचा लाडका सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता.... गणपती बाप्पा हा "अवयव प्रत्यारोपण" म्हणजेच " Organ transplantation" याचे एक उदाहरण आहे. यात भगवान श्री शंकरांनी ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण करणाऱ्या शल्यचिकित्सकाची ( Transplant surgeon) भूमिका निभावलेली आहे.
![]() |
गणपती बाप्पा मोरया...... The divine example of organ transplantation!!! |
आपले शासन, इतर सेवाभावी संस्था व अनेकांनी या महान कार्यासाठी चळवळ सुरू केली आहे. परंतु ती फक्त त्यांचीच जबाबदारी नसून, एक भारतीय नागरिक म्हणून..... या उमद्या कामासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया !
चलो हसने की कोई, हम वजह ढुंढते हैं,
यहाँ जमीं पे ही कहीं, हम सतह ढुंढते हैं,
चलो किसी की अंधेरी जिंदगी में हम सुबह बनते है.......
दोस्तों, अवयवदान करते है |
© Dr.Aparna V. Patil
MD ( obstetrics and gynaecology)
Organ Donation awareness.
Mumbai.
( वरील शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

आयुषच्या शेवटी खरंच या देहाचा उपयोग होत असेल तर नक्की च *देहदान* करणार
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअवयव दान करण्याबद्दल जागृती करणारा लेख.
थोर विचार madam,. आपले आभारी माहिती बद्दल.
ReplyDeleteThank you. आपल्या व्यक्तीमत्वा प्रमाणेच आपले विचारही उच्च आहेत.
ReplyDelete