काय फरक आहे अवयवदान व देहदानात ? डॉ. अपर्णा पाटील
श्री. रतन टाटा यांनी योग्यच म्हटले आहे.....
"There is a lot of difference between human being and being human. Very few understand it...."
Friends.....
Be kind, recycle yourself, live after death !
अवयवदान व देहदान हे दोन्ही भिन्न आहेत.
देहदानात पूर्ण शरीराचे दान केले जाते. मृत शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवून घेतले जाते. मृत्यू संसर्गजन्य रोगामुळे झालेला नसेल, तर वैद्यकीय महाविद्यालयात देहदान मान्य केले जाते.
अवयवदानात अवयव काढले जातात व प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत मृत शरीर सन्मानपूर्वक रित्या नातेवाईकांना अंतिम कार्यासाठी दिले जाते.
आपल्या देहरूपी मंदिरात, अवयव हा मौल्यवान घटक आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीमध्ये आपण अजून अवयव तयार करू शकलो नाही. मित्रहो...... अवयवदान हेच श्रेष्ठदान !!!
अवयवदान करा..... अवयवदानाविषयी जसे जमेल त्यापद्धतीने जनजागृती करा !!!
"मरावे परी अवयवरूपी उरावे|"
© Dr. Aparna V. Patil
MD( obstetrics and Gynaecology)
Organ Donation awareness
( वरील शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments
Post a Comment