कसे करू शकतो आपण हे अवयवांचे पुण्यदान ? डॉ. अपर्णा पाटील .
मित्रांनो........
आपल्या मनात असे काहूर माजले असेल की मी कसे करू शकतो /शकते हे अवयवदान -
कसे करावे हे पुण्यदान?
अगदी सोपे आहे मित्रांनो ..
याबाबतीत ZTCC म्हणजे Zonal transplant Co-ordination Centre ही महत्वाची संस्था कार्यरत आहे .
१) www . ztccmumbai.org या संकेतस्थळास भेट द्या .
२) आपल्याला एक pledge form म्हणजे शपथपत्र भरावे लागते . तो खालीलप्रमाणे
३) तो form भरून आपण खालील स्थळी पाठवा .
पत्ता: सायन हॉस्पिटल,
कॉलेज बिल्डिंग, २ रा मजला,
मेडीकल स्टोअर्स जवळ ,
सायन ( प ),
मुंबई - ४०००२२
किंवा,
E-mail: organtransplant@ztccmumbai.org
४)ZTCC ही संस्था आपल्याला donor card पाठवेल . किंवा आपण donor card संकेतस्थळावरून download करून घेऊ शकता.
परंतू हे लक्षात घ्या , मित्रांनो की हे donor card नेहमी आपल्या जवळ बाळगा व तुमच्या या अवयवदान करण्याच्या इच्छेबददल आपले नातेवाईक व मित्र मंडळी ना कल्पना देऊन ठेवा .
कारण आपले अवयव ही शासनाची मालमत्ता नाही. शासन किंवा डॉक्टर नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदानास मान्यता देऊ शकत नाहीत .
म्हणजे, उदया माझा मृत्यू cardiac death ने झाला तर नातेवाईक माझे त्वचा किंवा नेत्रदान करू शकतात परंतु Brain death ने झाला तर माझ्या vital organs चे दान होऊ शकते . परंतु याला माझ्या जवळच्या नातेवाईकांची संमती हवी .
एक संस्कृत सुभाषित आठवले मित्रांनो - - -
"परोपकाराय फलन्ति वृक्षाः
परोपकाराय वहन्ति नद्यः ।
परोपकाराय दुहन्ति गावः
परोपकारार्थमिदं शरीरम् ॥"
( झाडे फळतात दुसऱ्यांसाठी, नदी वाहते दुसऱ्यांसाठी, गाय दुध देते दुसऱ्यांसाठी ; आपल्या शरीराचाही उपयोग झाला पाहिजे दुसऱ्यांसाठी ... . . . . परोपकारासाठी !!! )
बघा, आपल्या मृत्यूनंतरही आपल्या अवयवांद्वारे दुसऱ्या जीवांना जीवनदान देणे याहून महान कार्य ते कोणते ?
© Dr. Aparna Viraj Patil
MD(Obstetrics and Gynaecology)
Organ donation awareness
Mumbai.
( वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)



Comments
Post a Comment