अवयवदाना विषयी आपणा सर्वांना आवाहन . डॉ. अपर्णा पाटील .
" कुछ मीठी सी ठंडक है,
आज इन हवाओं में...
शायद, किसी के अवयवदान से...
किसी को नयी जिंदगी मिल गई |"
अवयवदान म्हणजे जीवनदान ! लाखो करोडो लोक दरवर्षी जगभरात आपले प्राण , केवळ निरोगी अवयव वेळेवर न मिळाल्यामूळे गमावतात .
one organ can make the difference.Be a donor!!!
आपले आयुष्य म्हणजे एक जीवन गाणे आहे. या गाण्यात कधी चढ तर कधी उतार - कधी upbeat तर कधी mellow, शांत !
आणि मग एक दिवस Grand finale !
पण आपण ह्या गाण्याचा ताल, सूर जगवू शकतो - Remix बनवून ! हिंदी चित्रपटांत अनेक जून्या गाण्यांचे remix करून वेगळी आवृत्ती तयार करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर " तेजाब" या चित्रपटातील,
" एक, दो, तीन, चार, पाँच, छे, सात, आठ, नौ......"
या गाण्याने इतिहास रचला. एका रात्रीत "माधूरी दिक्षित " ला प्रसिद्धी मिळाली. पून्हा हेच गाणे " बागी २ " ह्या चित्रपटात " जॅकलीन फर्नांडीस " हिच्यावर चित्रित करण्यात आले. जून्या गाण्याची नवी आवृत्ती! दोन्ही गाणी आपल्याला तेवढाच आनंद देतात.
करू शकतो आपणही हे सर्व.....
तुम्ही ही तुमचे जीवनगाणे वाटू शकता दुसऱ्यांना ...
Friends , share your lifesong . Organ Donation makes it possible ! Donate organs !!
आज शासन काही संस्था व अनेक लोकांनी या उमद्या कार्यासाठी एकत्र येऊन अवयवदानाची मोहीम हाती घेतली आहे. भारतातील सर्व धर्मांनी ह्याला पाठींबा देऊन एक थोर काम मानले आहे. अवयवदानासाठी जनजागृतीची खुप मोठी गरज आहे . शाळा, महाविद्यालये, पोलीस, बसचालक , कंडक्टर, विविध प्रचार माध्यम,सोशल मिडीया या सर्व माध्यमांचा उपयोग करून आपण जनजागृती करण्यास हातभार लाऊ शकतो.
![]() |
दोस्तों , अर्ज किया है ...
"बड़ी कश्मकश है ऐ खुदा,
थोड़ी रहमत कर दे...
अवयवदान के बारे में,
हर दिल में ख्वाईश पैदा कर दे |"
© Dr Aparna Viraj Patil
MD(Obstetrics and Gynaecology)
Organ donation awareness
Mumbai.
( वरील शब्दांकन डॉ.अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे .)

Comments
Post a Comment