कसे होते अवयवांचे वितरण ? डॉ. अपर्णा पाटील .
अवयवांचे वितरण
कभी कभी रिश्तों की कीमत वो लोग समजा देते है,
जिनसे हमारा कोई रिश्ता नही होता.......
आपल्या भारतात 1994 साली अवयवप्रत्यारोपण चा कायदा लागू झाला. त्यात " मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान " याला पूर्णपणे मान्यता दिली आहे. इतकच काय पण भारतात सर्व धर्मांनी हे पुण्य काम मानलेले असून, अवयवदानाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे.
आता आपल्या मनात असे प्रश्न येऊ शकतो की,
मला अवयव दान करायचे आहे तर.....
माझ्या मृत्यूनंतर माझ्या अवयवांचे वितरण कसे होणार ?
माझे अवयव कोणाला बरं जाणार?
एखाद्या श्रीमंत व्यक्तीला जाणार का ?
एखाद्या विशेष धर्माच्या व्यक्तीला जाणार का ???
तर
मित्रांनो,लक्षात घ्या,
गरजू रुग्णांचे...
वय
रक्तगट,
त्यांच्या आजाराची तीव्रता,
ते किती दिवस या अवयवाची प्रतिक्षा करीत आहेत,
त्यांची वैद्यकीय गरज,
यासाठी रुग्णांना काही गुण दिले जातात.त्यांची एक" समाईक प्रतिक्षा यादी "बनवली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव वितरण केले जाते. महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार ते पारदर्शक पणे होते.
यात गरजू रुग्णाची आर्थिक स्थिती, जात,धर्म अशा बाबींचा विचार केला जात नाही.
अवयवदान हे शुद्ध व श्रेष्ठ दान आहे.मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला किंवा मित्रांना कोठलाही आर्थिक वा इतर स्वरूपाचा मोबदला दिला जात नाही.अवयवदानाला संमती दिल्यावर अवयवदाना संदर्भात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा खर्च तसेच इतर वैद्यकीय खर्च मृतांच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
मित्रहो...
Realise that nothing can give more happiness than a selfless act done for others !!!
आजच्या युगात अवयवदान ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. व्यवस्थित माहिती नसल्या कारणामुळे, काही गैरसमजुतीमुळे अवयव दानात लोकांचा सहभाग कमी जाणवतो.
म्हणूनच अवयवदानाविषयी जागरूकता महत्त्वाची आहे.
©Dr. Aparna V. Patil
MD ( Obstetrics and gynaecology)
Organ Donation awareness.
(वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments
Post a Comment