अवयवदान - त्वचादान !! डॉ. अपर्णा पाटील .

 

                            त्वचादान - महादान !

" Value  of  life depends  on  the  love given  &  shared . Recycle  yourself  !! "


आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा !!


              छायाचित्र सौजन्य .... Google


आपल्या भारतात acid attack , भाजून हुंडाबळी अशा अनेक दुःखद घटना आपण पाहतो . भाजल्यामुळे  या व्यक्तिला खूप खूप भयंकर वेदना होतात . इतक्या वेदना की त्वचेवर एखादा तलम कपडाही सहन होत नाही . त्वचा इतकी निकामी झालेली असते की ना ती संरक्षण देते , ना तिचा कसला उपयोग, पण त्यात जंतूसंसर्ग होऊन जीवाला महाभयंकर यातना मात्र होतात .


याला अचूक उपचारपद्धती मधला एक महत्वाचा भाग म्हणजे त्वचेचे आवरण ! 

त्वचेची  replacement  त्वचेनेच ! 

     रुग्णाच्या वेदना कमी होतात ; 

       जखमेला संरक्षित आवरण मिळते ; 

       विद्रुपता कमी होते .


अत्यंत महत्वाचे म्हणजे - त्वचादानात , NO matching is required !!!


साधारणतः मृत्यू नंतर ६ तासात त्वचादान करावे . परंतु १२ तासापर्यन्त मान्यता आहे . केवळ ४५ मिनिटात त्वचा गोळा केली जाते . त्यासाठी Burns Helpline वर फोन केल्यावर मेडिकल टीम आपल्या Specialized Burns ambulance मधून घरी पोहचते . त्वचा मांडीच्या समोरील भागातून व पाठीच्या भागावरून घेतली जाते . केवळ वरवरचे म्हणजे superficial layers घेतले जातात व त्यावर ड्रेसींग लावले जाते ......शरीराला विद्रूपता येत नाही ; रक्तस्त्राव होण्याचा  पण प्रश्न नाही .


आपल्याला त्वचादानाचे मूल्य कळायला हवे . परदेशात  केवळ  १ocm x १०cm  एवढ्या  त्वचेला ₹ ५००००/- एवढा खर्च येतो  व आपण हा मुल्यवान अवयव जाळतो , पुरतो - फुकट घालवतो .

आपत्या सर्वांना याची कुठेतरी खंत वाटली पाहीजे, 

मित्रांनो !   काय उपयोग आहे आपल्याला त्वचेचा , मृत्यूनंतर ??? 

त्वचादान करा मित्रांनो, त्वचादान करा !!!


"  Be  someone's  second  chance ! Donate  organs , because  you  can  !! "



Some important phone numbers for skin donation ......

Burns helpline

022  27793333

022  27791010







©Dr Aparna Viraj Patil

MD(Obstetrics and Gynaecology)

Organ donation awareness.




(वरील  माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ . अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments

Popular posts from this blog

contact us ...अत्यंत महत्वाचे फोन नंबर अवयवदानासाठी - -- डॉ. अपर्णा पाटील .

कसे होते अवयवांचे वितरण ? डॉ. अपर्णा पाटील .

कोणत्या अवयवांचे दान करू शकतो आपण , जिवंतपणी व मृत्यूनंतर ? डॉ. अपर्णा पाटील.