अवयवदानाविषयी गैरसमजुती.... डॉ. अपर्णा पाटील .
अवयवदानाविषयी अनेक गैरसमज दिसून येतात.या गैरसमजुती पूर्णपणे नष्ट होण्यास जागरूकता महत्त्वाची आहे.
काही गैरसमजुती खालीलप्रमाणे....
१) अवयवदानाने शरीरास विद्रुपता येते का?
नाही. अवयव काळजीपूर्वक मृत शरीरातून काढले जातात. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीने केली जाते तितक्या काळजीपूर्वक मृत शरीरातून अवयव काढले जातात व जखम पून्हा शिवली जाते . शरीरावर टाके मात्र राहतात . यानंतर शरीर सन्मानपूर्वक नातेवाईकांना अंतिमकार्यासाठी दिले जाते.
२) जर मी अवयवदान केले तर पुढच्या जन्मी व्यंगत्व येते का ? व्यंग स्वरूपात माझा जन्म होणार का?
पुनर्जन्म आहे की नाही , याबद्दल आजवर कोणालाही कल्पना नाही . स्वतः मी पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही . परंतु सांगायचे झाले तर, या प्रश्नाचे थोडे मजेशीर पद्धतीने उत्तर देता येईल ....जर कोणी मृत व्यक्तीने व्यक्तीने आपल्या हृदयाचे दान केले तर पुढच्या जन्मी ह्या व्यक्तीचा ह्यदया शिवाय जन्म कसा बरं होऊ शकेल ??
किंवा जर कोणी नेत्रदान केले तर ,पुढच्या जन्मी ती व्यक्ती आंधळी जन्माला येणार का ??
याचा विचार आपणच करावा, असे मला वाटते.
३) अवयव दानाविषयी आणखी एक समजूत अशी, की जर रुग्ण organ donor असेल तर डॉक्टर त्यांना व्यवस्थित उपचार करत नाहीत.
मित्रहो , एक गोष्ट लक्षात घ्या - केवळ अवयव मिळवण्यासाठी .....रूग्णाच्या जीवावर बेतून अवयव कधीच घेतले जात नाही .
organs are never taken at the cost of donor 's life!
डॉक्टर आपले ज्ञान, उपकरणे, औषधे पणाला लाऊन या रुग्णाचे प्राण वाचवण्याचे अथक प्रयत्न करतात . पण यास यश मिळाले नाही; रुग्णाला वाचवणे अशक्य झाले ,तर हा पुण्यदानाचा पर्याय नातेवाईकाना सुचवला जातो .
अवयव ही डॉकटरांची किंवा शासनाची मालमत्ता नाही . संमतीच्या विरुद्ध जाऊन अवयव कोणीही काढून घेऊ शकत नाही .
४) अवयवदान ठराविक वयोगटातच करता येते का ?
अवयवदान करण्यास कोणत्याही वयोगटाची मर्यादा नाही . अवयवाची रचना व कार्य उत्तम असेल तर लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यकती पर्यन्त अवयवदान करता येते.
५) मधूमेह किंवा जास्त रक्तदाब किंवा इतर काही मेडीकल व्याधी असलेल्या व्यक्तिला अवयवदान करता येते का ?
जरूर करता येईल . हा निर्णय डॉक्टरर्स त्या त्या वेळी अवयवयांची कार्यक्षमता पाहून घेतात .
६) कर्करोग असलेल्या व्यक्तिस अवयव दान करता येईल का?
कर्करोग (Cancer) असलेल्या व्यकतीस अवयवदान करता येत नाही .जर benign tumour म्हणजे साधाच ट्यूमर असेल तर दान करता येईल .
७) HIV positive असलेली व्यक्ति अवयवदाना त सहभागी होऊ शकते का?
हो - ही व्यक्ती दुसऱ्या HIV पॉझीटीव्ह व्यकती ला अवयवदान करू शकते .
८) अवयवदान व social media वर येणारे fake messages......
social media वर अवयवदानाविषयी बरेच fake म्हणजे खोटे मेसेज येताना दिसतात . जसे अमूक अमूक व्यकती चे अवयवदान करायचे आहे तर इच्छुक लोकांनी संपर्क करा व असे अनेक ... . .
लक्षात घ्या - अवयवदान या पद्धतीने होत नाही . ज्या रुग्णांना डॉक्टरांनी अवयवांची गरज लागणार आहे . . . . म्हणजे ज्या रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे, त्या रुग्णांना प्रथम शासनाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे हे रजिस्टर करावे लागते. त्यांच्या - वय, रक्तगट, त्यांच्या रोगाची तीव्रता, त्यांची अवयवासाठीची प्रतिक्षा ..... ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन समाईक प्रतिक्षायादी बनवली जाते व प्रत्येक रुग्णाला waiting number दिला जातो. अवयवदान शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार पारदर्शकपणाने होते. ZTCC (Zonal Transplant Co-ordination Centre) ही अधिकृत संस्था त्यासाठी कार्यरत आहे.
अवयवाचा व्यापार केला जात नाही .
Nobody can sell ... . . nobody can buy organs !
These are fake messages !!!
'आपल्या मृत्यूनंतरही आपल्या अवयवांद्वारे दुसऱ्या जीवांना जीवनदान देणे हे फार मोठे पूण्यकाम आहे ' मित्रहो !.
©Dr. Aparna Viraj Patil
MD(Obstetrics and Gynaecology)
Organ donation awareness.
( वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)


Comments
Post a Comment