मस्तिष्क स्तंभ मृत्यू ( Brain stem death ) म्हणजे काय ?? डॉ . अपर्णा पाटील .
मस्तिष्कस्तंभ मृत्यू ( Brain stem death or Brain death) म्हणजे नक्की काय?
"अवयवदानाविषयी जनजागृती" यात हा फार महत्वाचा विषय आहे, असे मला वाटते. ही व्यक्ती कमीत कमी ७ ते ९ जणांना जीवनदान देऊ शकते. परंतु , बरेचसे सर्वसाधारण लोक मस्तिष्कस्तंभ मृत्यू व कोमा ह्यातील फरक समजण्यात गोंधळ करतात......
• कोमातील रुग्ण हा मृत नसतो... तो क्वचित कधीतरी शुद्धीत येऊ शकतो ; परंतु मस्तिष्कस्तंभ मृत व्यक्ती ही मृत असते.
• कोमातील रुग्णाचा नेहमीप्रमाणे श्वास चालू असतो ; परंतु मस्तिष्कस्तंभ मृत व्यक्तीचा श्वास व ह्यदय कृत्रिम साधनांनी चालू ठेवलेले असते.
• कोमातील रुग्ण काही गोष्टींना प्रतिसाद देतो..... जसे नखांवर जोरात दाब दिला तर आपला हात हलवू शकतो किंवा चेहऱ्यावरील भाव बदलू शकतो ; परंतु मस्तिष्कस्तंभ मृत व्यक्ती या कोणत्याही गोष्टींना प्रतिसाद देत नाही, कारण तो मृत असतो.
Brain dead व्यक्ती जगण्याची काही शक्यता असते का?
नाही. अजिबात नाही."Brain death is an irreversible death."
मग कसा होतो हा मस्तिष्क स्तंभ मृत्यू?
Friends....
आपल्या मेंदूचा महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तिष्क स्तंभ ( Brain stem) , हा श्वसन ( Respiration) व चेतना ( consciousness) या दोन महत्त्वाच्या कार्यावर नियंत्रण करतो.
या भागाला कोणत्याही कारणाने, जसे...... अपघात किंवा एखादा ट्यूमर , यामुळे इजा झाल्यास
⬇️
मेंदूला सुज यावयास सुरुवात होते, परंतु डोक्याच्या कडक कवटी मुळे त्याला प्रसरण पावण्यास जागा नसते.
⬇️
अशावेळी डॉक्टर्स औषधे देऊन रुग्णांचा जीव वाचवण्याचा , सूज कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
⬇️
परंतु त्यात यश आले नाही , तर या सुजलेल्या मेंदूचाच दाब त्याच्याच रक्तवाहिन्यांवर पडतो व मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा तसेच प्राणवायू ( Oxygen ) थांबतो व या पेशी विरघळण्यास सुरुवात होते.
⬇️
मस्तिष्क स्तंभ किंवा Brain stem या पेशी मरतात.... त्यांचे कार्य थांबते.
⬇️
कार्य थांबले की श्वसन ( Respiration) थांबते .
⬇️
ह्रदय व इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य थांबते......
मग आपण म्हणाल की....... जर ह्यदय व इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नष्ट होत असेल , तर ही व्यक्ती कसे काय करू शकते महत्त्वाच्या अवयवांचे दान ??
लक्षात घ्या, की
हा रुग्ण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर असतो. महत्वाचे म्हणजे या रुग्णाचा श्वास कृत्रिम रित्या चालू असतो. हृदयाचे काम हे मेंदू वर अवलंबून नाही. त्याला फक्त प्राणवायू हवा. जोपर्यंत प्राणवायू मिळेल तोपर्यंत ह्यदय काही काळ कार्य करू शकते..... मग ते एकतर काही तास किंवा काही दिवस कार्य करू शकते.
हृदयाचे कार्य चालू असल्यामुळे इतर अवयवांना प्राणवायू मिळतो व तेही कार्याबाबत जिवंत राहतात व याच काळात प्रमुख अंतर्गत अवयवदान होऊ शकते.
महत्वाचे हे की, असा डोक्याला इजा झालेला रुग्ण आला तर डॉक्टर आपले ज्ञान , उपकरणे ,औषधे हे पणाला लावून..... त्याचे प्राण वाचवण्याचे, अथक प्रयत्न करतात. या रुग्णाच्या जीवावर बेतून अवयव घेतले जात नाहीत.
"Organs are are never taken at the cost of donors life."
Friends, या परिस्थितीमध्ये प्रश्न असा उद्भवतो की कुटुंबीयांनी काय करावे ?
... हा मृत्यू झाल्यानंतर, ह्यदय व पर्यायाने इतर सर्व अवयव निकामी होण्याची वाट पहावी की अवयवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवण्याचे महान कार्य करावे ......
हे असे लिहणे फार सोपे आहे ; परंतु कुटुंबीय आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्युच्या धक्क्यामधून सावरत असतात, तेव्हा प्रत्येक फॅमिलीसाठी हा फार मोठा कठीण प्रश्न आहे. त्यामुळे मी असे म्हणेन की यावेळी कुटुंबावर कसलाही दबाव नसून, त्यांनी त्यांना योग्य वाटेल असा निर्णय घ्यावा....
"म्हणूनच जनजागृती ही फार महत्त्वाची आहे."
आपले प्रिय माणूस निघून गेले आहे या जगातून ...... पण त्याचे काही अवयव दुसऱ्या रुग्णांना जीवनदान देऊ शकतात. आपलं प्रिय माणूस त्याच्या अवयवांच्या द्वारे या जगात जिवंत राहू शकते किंवा राहणार आहे .... ही कल्पनाच आपल्या मनाला त्या दुःखातही आनंदाच्या सरी प्रमाणे आहे.
मित्रहो ,
© Dr. Aparna V. Patil
MD ( obstetrics and gynaecology)
Organ Donation awareness.
(वरील माहिती संकलन आणि शब्दांकन डॉ. अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

Comments
Post a Comment