Posts

contact us ...अत्यंत महत्वाचे फोन नंबर अवयवदानासाठी - -- डॉ. अपर्णा पाटील .

Image
  मित्रहो , For skin donation.... Burns helpline 022  27793333 022  27791010 For Eye donation... 1919 9320611919 9320411919 24×7  emergency number. 9320063468 Other few important numbers. 2402 8197 9167663469 Zonal Transplant Co- Ordination Centre Visit:         www.ztccmumbai.org E-mail:     organtransplant@ztccmumbai.org मित्रहो  ,  " Nurture  your  minds  with  great  thoughts.   Be an organ donor !!!" © Dr. Aparna Viraj Patil MD (Obstetrics and Gynaecology) Organ donation awareness. Mumbai. ( वरील शब्दांकन डॉ.अपर्णा पाटील यांचे कॉपीराईट आहे.)

अवयवदाना विषयी आपणा सर्वांना आवाहन . डॉ. अपर्णा पाटील .

Image
 ‌    "  कुछ  मीठी सी ठंडक है,         आज इन हवाओं में...      शायद, किसी के अवयवदान से...      किसी को नयी जिंदगी मिल गई |" अवयवदान  म्हणजे  जीवनदान ! लाखो करोडो लोक दरवर्षी जगभरात आपले प्राण , केवळ निरोगी अवयव वेळेवर न मिळाल्यामूळे गमावतात . one organ can make the difference. Be a donor!!! आपले आयुष्य म्हणजे एक जीवन गाणे आहे. या गाण्यात कधी चढ तर कधी उतार - कधी upbeat तर कधी mellow, शांत ! आणि मग एक दिवस Grand finale ! पण  आपण  ह्या गाण्याचा ताल, सूर जगवू शकतो - Remix  बनवून ! हिंदी चित्रपटांत अनेक जून्या गाण्यांचे remix करून वेगळी आवृत्ती तयार करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर " तेजाब"  या चित्रपटातील, " एक, दो, तीन, चार, पाँच, छे, सात, आठ, नौ......" या गाण्याने इतिहास रचला. एका रात्रीत "माधूरी दिक्षित " ला प्रसिद्धी मिळाली. पून्हा हेच गाणे " बागी २ " ह्या चित्रपटात " जॅकलीन फर्नांडीस " हिच्यावर चित्रित करण्यात आले. जून्या गाण्याची नवी आवृत्ती! दोन्ही गाणी आपल्याला तेवढाच आनंद देतात. करू शकतो आपणही हे सर्व..... तुम्ही ही त

कसे करू शकतो आपण हे अवयवांचे पुण्यदान ? डॉ. अपर्णा पाटील .

Image
              मित्रांनो........ आपल्या मनात असे काहूर माजले असेल की मी कसे करू शकतो /शकते हे अवयवदान - कसे करावे हे पुण्यदान? अगदी सोपे आहे मित्रांनो .. याबाबतीत ZTCC म्हणजे Zonal transplant Co-ordination Centre ही महत्वाची संस्था कार्यरत आहे . १) www . ztccmumbai.org  या संकेतस्थळास भेट द्या . २) आपल्याला एक pledge form म्हणजे शपथपत्र भरावे लागते . तो खालीलप्रमाणे                                  शपथपत्र / pledge form. ३) तो form भरून आपण खालील स्थळी पाठवा . पत्ता: सायन हॉस्पिटल,          कॉलेज बिल्डिंग, २ रा मजला,          मेडीकल स्टोअर्स जवळ ,          सायन ( प ),          मुंबई - ४०००२२ किंवा, E-mail:  organtransplant@ztccmumbai.org ४)ZTCC ही संस्था आपल्याला donor card पाठवेल . किंवा आपण donor card संकेतस्थळावरून download करून घेऊ शकता. परंतू हे लक्षात घ्या , मित्रांनो की हे donor card नेहमी आपल्या जवळ बाळगा व तुमच्या या अवयवदान करण्याच्या इच्छेबददल आपले नातेवाईक व मित्र मंडळी ना कल्पना देऊन ठेवा . कारण आपले अवयव ही शासनाची मालमत्ता नाही . शासन किंवा डॉक्टर नातेवाईकांच्या संमतीशिवा

काय फरक आहे अवयवदान व देहदानात ? डॉ. अपर्णा पाटील

Image
श्री. रतन टाटा यांनी योग्यच म्हटले आहे..... "There  is  a  lot  of  difference  between human  being  and  being  human. Very few  understand  it...." Friends..... Be  kind,  recycle  yourself, live  after death ! अवयवदान व  देहदान   हे दोन्ही भिन्न आहेत .   देहदानात पूर्ण शरीराचे दान केले जाते. मृत शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवून घेतले जाते. मृत्यू संसर्गजन्य रोगामुळे झालेला नसेल, तर  वैद्यकीय महाविद्यालयात देहदान मान्य केले जाते.  अवयवदानात अवयव  काढले जातात  व  प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत मृत शरीर सन्मानपूर्वक रित्या नातेवाईकांना अंतिम कार्यासाठी दिले जाते.  आपल्या देहरूपी मंदिरात, अवयव हा मौल्यवान घटक आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीमध्ये आपण अजून अवयव तयार करू शकलो नाही. मित्रहो...... अवयवदान हेच श्रेष्ठदान !!! अवयवदान करा..... अवयवदानाविषयी जसे जमेल त्यापद्धतीने जनजागृती करा !!! "मरावे परी अवयवरूपी उरावे|" © Dr. Aparna V. Patil MD( obstetrics and Gynaecology) Organ Donation awareness ( वरील शब्दांकन डॉ. अपर्णा पाटी

अवयवदानाविषयी गैरसमजुती.... डॉ. अपर्णा पाटील .

Image
  अवयवदानाविषयी अनेक गैरसमज दिसून येतात.या गैरसमजुती पूर्णपणे नष्ट होण्यास जागरूकता महत्त्वाची आहे. काही गैरसमजुती खालीलप्रमाणे.... १) अवयवदानाने शरीरास विद्रुपता येते का? नाही . अवयव काळजीपूर्वक मृत शरीरातून काढले जातात. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या  काळजीने केली जाते तितक्या काळजीपूर्वक मृत शरीरातून अवयव काढले जातात व जखम पून्हा शिवली जाते . शरीरावर  टाके   मात्र राहतात . यानंतर  शरीर  सन्मानपूर्वक नातेवाईकांना अंतिमकार्यासाठी  दिले  जाते . २) जर मी अवयवदान केले तर पुढच्या जन्मी व्यंगत्व  येते  का ? व्यंग स्वरूपात माझा जन्म होणार का? पुनर्जन्म आहे की नाही , याबद्दल आजवर कोणालाही कल्पना नाही . स्वतः मी पुनर्जन्मावर  विश्वास ठेवत नाही . परंतु सांगायचे झाले तर, या प्रश्नाचे थोडे मजेशीर पद्धतीने उत्तर देता येईल ....जर कोणी मृत व्यक्तीने व्यक्तीने आपल्या हृदयाचे दान केले तर पुढच्या जन्मी ह्या व्यक्तीचा ह्यदया शिवाय जन्म कसा बरं होऊ शकेल ??  किंवा जर कोणी नेत्रदान केले तर ,पुढच्या जन्मी  ती व्यक्ती आंधळी जन्माला येणार का ??   याचा विचार आपणच करावा, असे मला वाटते. ३) अवय

कसे होते अवयवांचे वितरण ? डॉ. अपर्णा पाटील .

Image
                      अवयवांचे वितरण कभी कभी रिश्तों की कीमत वो लोग समजा देते है, जिनसे हमारा कोई रिश्ता नही होता....... आपल्या भारतात 1994   साली अवयवप्रत्यारोपण चा कायदा लागू झाला. त्यात " मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान " याला पूर्णपणे मान्यता दिली आहे. इतकच  काय पण भारतात सर्व धर्मांनी हे पुण्य काम मानलेले असून, अवयवदानाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आता आपल्या मनात असे प्रश्न येऊ शकतो  की,  मला अवयव दान करायचे आहे तर.....  माझ्या मृत्यूनंतर माझ्या अवयवांचे वितरण कसे होणार ?  माझे अवयव कोणाला बरं जाणार?    एखाद्या श्रीमंत व्यक्तीला जाणार का ?  एखाद्या विशेष धर्माच्या व्यक्तीला जाणार का ??? तर मित्रांनो,लक्षात घ्या,  गरजू रुग्णांचे... वय रक्तगट,  त्यांच्या आजाराची तीव्रता, ते किती दिवस या अवयवाची प्रतिक्षा करीत आहेत,  त्यांची वैद्यकीय गरज,  यासाठी रुग्णांना काही गुण दिले जातात.त्यांची एक" समाईक प्रतिक्षा यादी "बनवली जाते  व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव वितरण केले जाते. महाराष्ट्र  शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार ते पारदर्शक पणे होते. यात गरजू रुग्णाची आर्थिक

अवयवदान - त्वचादान !! डॉ. अपर्णा पाटील .

Image
                              त्वचादान - महादान ! " Value  of  life depends  on  the  love given  &  shared . Recycle  yourself  !! " आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा !!               छायाचित्र सौजन्य .... Google आपल्या भारतात acid attack , भाजून हुंडाबळी अशा अनेक दुःखद घटना आपण पाहतो . भाजल्यामुळे  या व्यक्तिला खूप खूप भयंकर वेदना होतात . इतक्या वेदना की त्वचेवर एखादा तलम कपडाही सहन होत नाही . त्वचा इतकी निकामी झालेली असते की ना ती संरक्षण देते , ना तिचा कसला उपयोग, पण त्यात जंतूसंसर्ग होऊन जीवाला महाभयंकर यातना मात्र होतात . याला  अचूक उपचारपद्धती मधला एक महत्वाचा भाग म्हणजे त्वचेचे आवरण !  त्वचेची  replacement  त्वचेनेच !        रुग्णाच्या वेदना कमी होतात ;         जखमेला संरक्षित आवरण मिळते ;         विद्रुपता कमी होते . अत्यंत महत्वाचे म्हणजे - त्वचादानात ,  NO matching is required !!! साधारणतः मृत्यू नंतर ६ तासात त्वचादान करावे . परंतु १२ तासापर्यन्त मान्यता आहे . केवळ ४५ मिनिटात त्वचा गोळा केली जाते . त्यासाठी Burns Helpline वर फोन केल्यावर मेड